विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना करता येणार पोलिसांविरुद्ध तक्रार..

मेकिंग महाराष्ट्र (प्रतिनिधी) दि ३० – पुणे  तक्रारीची दखल घेतली नाही, गुन्हा दाखल केला नाही, आक्षेपार्ह वर्तन केले, चुकीच्या पद्धतीने तपास केला, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य किंवा तीव्र केले आदी विविध प्रकारच्या तक्रारी ‘विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणा’त नागरिकांना आता पोलिसांविरुद्ध तक्रार करता येऊ शकते .तक्रार केल्यावर स्वतःची बाजू नागरिक स्वतः मांडू शकतात. त्यासाठी वकीलही नियुक्त करण्याची गरज नाही.तसेच ही संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे.पोलिसांच्या वर्तनाबद्दल आणि तपासाबद्दल नागरिकांच्या तक्रारी असतात. परंतु अनेकदा पोलिस आयुक्त किंवा अधीक्षक स्तरावर त्याची दखल घेतली जात नाही.त्यामुळे न्यायालयात तक्रार करण्याशिवाय नागरिकांसमोर याशिवाय पर्याय राहत नव्हता आणि, ही प्रक्रिया वेळखाऊ देखील असते. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात तीन ठिकाणी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण स्थापन केली आहेत त्यात पुण्यातील प्राधिकरण सहा वर्षापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेले आहे. हे नागरिकांना अद्याप पर्यंत माहिती नसावे या प्राधिकरणाचा पहिला निकाल २५ एप्रिल रोजी लागला होता‘’… त्यामध्ये दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस प्राधिकरणाने राज्य सरकार व पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्याकडे केली होते. त्यामुळे आता पोलिसांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राधिकरणात नागरिकांना करता येईल. त्यासाठी नागरिकांना एक अर्ज करावा लागेल.त्यात तक्रार सिद्ध करण्यासाठी पुरेसे तपशील आवश्‍यक आहेत.शहर पोलिस दलातील मुख्यालय विभागाचे उपायुक्त यांची पदसिद्ध सदस्य म्हणून त्यावेळी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पदसिद्ध सचिव असतात.या प्राधिकरणात पुणे शहर व जिल्हा पोलिस, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील सर्व प्रकारच्या पोलिस आस्थापनांबाबत तक्रार करता येऊ शकते. त्यामुळे सीआयडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आदींविरुद्धही नागरिकांना येथे दाद मागता येऊ शकते .संबंधित तक्रारीची पडताळणी करून प्राधिकरण निकाल देते.त्या निकालात राज्य सरकार किंवा संबंधित पोलिस आयुक्त, अधीक्षकांना कारवाईची शिफारस प्राधिकरण करेल. हेही नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे आता नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही..

येथे आहे पोलिस तक्रार प्राधिकरण..

अनंत हाईट्‌स’ १ ला मजला, जाधवनगर, सर्व्हे क्रमांक २९-२-१, नांदेड सिटीजवळ,नांदेड फाट्याशेजारी सिंहगड रस्ता, पुणे ४११०६८ (दूरध्वनी क्र. २४३८००७४ – वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.३० मि) 

आणीबाणी आल्यास पोलीसात मोबाईल वरून तक्रार करण्यासाठी ११२ ला कॉल करू शकता..

एक महत्त्वाची सूचना..
तक्रार नोंदवताना दिलेला तक्रार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक देऊन नागरिक फोन कॉल/एसएमएस/वेब चॅटद्वारे 112 वर नोंदवलेल्या तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकतील. त्याची पडताळणी करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जातो हे लक्षात असू द्या..