महाराष्ट्र सोलापूर अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर गावातील घटना.
मेकिंग महाराष्ट्र सोलापूर (प्रतिनिधी)- भीमजयंती साजरी केली म्हणून मनुवादी प्रवृत्तीने टायर जाळून रास्तारोको व निषेध केला ही घटना सोलापुर अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर गावात घडली असून या घटनेमुळे पुन्हा एकदा जातियवादी चेहरा समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरां च्या जयंतीला गावातील येसीतून मुख्य प्रवेश द्वारातून घेवून जाण्यास अनेक वर्षांपासून विरोध होत होता आणि या हि वर्षी विरोध झाला,परंतु गावातील आंबेडकरी समाजाने प्रशासनावर दबाव आणला तेंव्हा परवानगी देण्यात आली. यामध्ये विशेष बाब म्हणजे, परवानगीला सुद्धा जातीयता चिटकली होती.केवळ पाच लोक गावातून जातील अशी अजब परवानगी प्रशासनाकडून देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.यामध्ये समाजाने ते ही मान्य केले.आणि फोटो घेऊन पाच लोक पोलीस बंदोबस्तात निघाले.गावातल्या मुख्य प्रवेश द्वारावर येताच समाजकंठक ,समाजविरोधी ,मनुवादी,जातीयवादी लोकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.आणि जोरजोरात आरडाओरडा करून विरोध केला.शेकडो पोलीसांच्या बंदोबस्तात आंबेडकरी समाजातील लोकांना घेऊन जाताना पोलीस प्रशासनाची मात्र थोड्यावेळापूर्ती तारांबळ उडाली आणि मोठी पळापळ झाली.यामधून असे दिसून येते की समाजातून जातीय भेदभाव महाराष्ट्र सारख्या राज्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील.अक्कलकोट तालुक्यात नागणसुर गावात अशी घटना घडल्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.