मेकिग महाराष्ट्र (प्रतिनिधी) – बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 18/2/24 रोजी शिवजयंती व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती शहरातील पोलिसांकडून रूट मार्च चे आयोजन करण्यात आले सदर रूट मार्च भिगवन चौक या ठिकाणाहून सायंकाळी 6.50 ज्या दरम्यान सुरू होऊन सुभाष चौक,गांधी चौक, गुणवडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते कसबा चौक या ठिकाणी रात्री 8.30 वाजता समाप्त झालेले आहे.या रूट मार्च मधे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड,पोलीस निरीक्षक दिनेश तायडे व पोलीस स्टेशनचे नवप्रविष्ठ पोलीस कर्मचारी,आरसीपी पथक असे एकुण 3 अधिकारी व 63 अंमलदार हजर होते.