प्रजासत्ताक दिन हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी ब्रिटीश वासाहतवादी भारत सरकार कायदा (१९३५) बदलून भारतीय राज्यघटना औपचारिकपणे स्वीकारण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली नवीन राज्यघटनेचे नामनिर्देशन करण्यात आले, त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे शिल्पकारही म्हणतात. या राज्यघटनेनुसार भारत लोकशाहीप्रधान देश बनला. याशिवाय आपल्या देशाच्या संविधानाला जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते.
भारतीय राज्यघटनेत महत्त्वपूर्ण तत्त्वे असून, या तत्त्वाच्या आधारावर देशातील सरकार आणि नागरिकांसाठी अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे ठरवण्यात आले आहेत.देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताकदिनी झेंडा फडकवण्यात येतो. तर राज्यांच्या राजधानीत राज्यपालांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात येतो.

राष्ट्रपती हे देशाचे सांविधानिक प्रमुख आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींना हा अधिकार आहे. पहिल्या प्रजासत्ताकदिनी डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते. राज्यघटना लागू झाल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इर्विन स्टेडियममध्ये त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला
