मेकिंग महाराष्ट्र – हडपसर (प्रतिनिधी)-हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि. 25/10/2023 रोजी पहाटे 04.00 वाजण्याच्या सुमारास गोसावी वस्ती, वैदवाडी,हडपसर या ठिकाणी दहशत निर्माण करून,वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी चांगला इंगा दाखवला याप्रकरणी अटक केलेले आरोपी नामे -1) यश प्रदीप जावळे,23 वर्षे, राहणार – सातव नगर रोड, हडपसर 2) सुरज रमेश पंडित, 29 वर्षे, राहणार – हांडेवाडी रोड,हडपसर यांच्यासह घटनास्थळावर जाऊन निवेदन पंचनामा करून गुन्हयामध्ये वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. व हडपसर चौकीपासून हडपसर परिसरात गावामध्ये त्यांची धिंड काढण्यात आली. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारांना हडपसर पोलिसांकडून कारवाई करण्यात आले आहे.
