उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपाचे विशालसिंह माने-पाटील यांच्या निवेदनाची तात्काळ घेतली दखल.

आसू / प्रतिनिधी)- राज्यात या वर्षी अनेक भागात पाऊस कमी प्रमाणात पडला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच शेतकऱ्यांना दुष्काळीची दाहकता भासू नये म्हणून नीरा नदीवरील निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे (उद्धट बॅरेजचे) दरवाजे बंद करावे, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाजपचे फलटण पूर्व भागाचे युवा नेते विशालसिंह माने-पाटील यांनी पुण्यात भेट घेऊन निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याची मागणी केली.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावुन नीरा नदीवरील निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले असता दुसऱ्याच दिवशी संबंधित अधिकाऱ्यांकडून या बॅरेजचे दरवाजे बंद करण्यात आले. याबाबत या तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते विशालसिंह माने-पाटील यांचे कैतुक होत आहे.दरम्यान, याबाबत भाजपचे युवा नेते विशालसिंह माने-पाटील यांना विचारले असता ते म्हणाले,  शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन लावलेल्या पिकाला जर योग्य प्रकारे पाणीच मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी मेहनत करून आणलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. शेतकऱ्यांच्या पिकाचे पाण्यावाचून नुकसान होऊ नये म्हणून नीरा नदीवरील निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे दरवाजे बंद करून पाणी अडवण्यात यावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बातचीत गरजेचे होते. कारण निरा-भिमा स्तरीकरण प्रकल्पाचे काम धाराशिव पाटबंधारे विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे पुणे या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याबाबत चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगेचच संबंधीत अधिकाऱ्यांना बोलावून दरवाजे बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन दरवाजे बंद केले. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याचे माने-पाटील म्हणाले. यावेळी गोरख पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत.