बारामती: बारामतीमधील एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यू प्रकरणाबाबत पोलिस प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणातील वैद्यकीय पोस्टपोस्टमार्टम (शवविच्छेदन) अहवाल आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या सखोल तपासानंतर संशयास्पद बाबी दूर झाल्या आहेत. ही आत्महत्याच असल्याचे स्प्ष्ट झाले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करण्यात आला असून उपलब्ध तांत्रिक पुरावे व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. नागरिक व प्रसारमाध्यमांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
