रुई येथे राष्ट्रसंत भगवानबाबा व राष्ट्रसंत वामनभाऊ पुण्यतिथीनिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम कीर्तन सोहळा उत्साहात 2026

मेकिंग महाराष्ट्र-बारामती (दि.10).राष्ट्रसंत भगवानबाबा व राष्ट्रसंत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त बारामती तालुक्यातील रुई (वंजारवाडी) येथे त्रिदिनी अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या भक्तीमय कार्यक्रमाची सुरुवात शनिवार दि. 10 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता होणार आहे.दि. 10/1/2026 रोजीच्या कार्यक्रमात सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत हा. भ. प. ज्ञानदास डॉ. विजयकुमार फड यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलांचे कीर्तन होणार आहे.

त्यानंतर भाविकांसाठी लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार असून यासाठी स्वादिष्ट डेअरी अँड स्वीट यांचे सौजन्य लाभले आहे.

संध्याकाळी व रात्रीच्या सत्रात रात्री 7.00 ते 9.00 या वेळेत हा. भ. प. कविराज महाराज झावरे (पारनेर) यांचे प्रभावी कीर्तन संपन्न होणार आहे.या कार्यक्रमासाठी श्री. मच्छिंद्र नरहरी चौधर, श्री. माऊली जालिंदर चौधर, श्री. संतोष नवनाथ चौधर व श्री. विशाल किसन चौधर यांचे सौजन्य लाभले आहे.हा त्रिदिनी अखंड हरिनाम कीर्तन सोहळा मारुती मंदिर, रुई (ता. बारामती) येथे आयोजित करण्यात आला असून श्री भैरवनाथ तरुण मंडळ रुई–वंजारवाडी, तालुका बारामती व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास तालुक्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.