मेकिंग महाराष्ट्र दि २३ – बारामती येथील ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन ही नोंदणीकृत सामाजिक संस्था दर वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. या वर्षा अखेर संस्थेने सुपे येथील प्राजक्ता मतिमंद मुलांची निवासी शाळा आणि गोजुबावी येथील निवासी शाळा यांना भेटी देऊन शाळेतील मुलांसाठी व संस्थेस किराणा साहित्य वस्तू रूपात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

सदर संस्था ही बारामती येथे महिलांच्या विविध उपक्रमास संधी देण्यासाठी नाव लौकिक असून जानेवारी 2026 मध्ये 9 ते 11 तारखेस जिजाऊ मंगल कार्यालय येथे संक्रांती निमित्ताने महिलांसाठी तीन दिवसीय भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सौ पोटे, सचिव सौ दर्शना जैन आणि त्यांचे परिवार, संस्थेचे सल्लागार श्री पतकी अश्विनी कुमार हे या उपक्रमात सहभागी झाले होते. या वेळी सौ. दर्शना जैन यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती निवासी शाळा संस्थापक यांना दिली.. दोन्ही निवासी संस्था यांनी उपक्रमा बाबत ड्रीम्स डिझाईनर्स फाऊंडेशन, बारामती यांचे विशेष कौतुक केले.पुढील येणाऱ्या वर्षात दोनशे सभासद असलेल्या या संस्थेकडून जेष्ठ नागरिकांसाठी कार्य करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे..
