राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रभाग क्रमांक ७ अ मधे प्रसाद खारतोडे यांना ६५% टक्के मतदान.!

ॲड. प्रसाद खारतोडे यांचा दणदणीत विजय.!

मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरातील काल झालेल्या मतदानामध्ये निवडणुकीचे निकाल लागले, नगरपरिषद निवडणूक निर्णयाधिकारी यांनी एकूण २० प्रभागातील निकाल जाहीर केले.यामध्ये बारामती शहरात चर्चेचा विषय ठरलेला प्रभाग क्रमांक ७ अ मधील उमेदवार प्रसाद खारतोडे यांचे सीट धोक्यात असल्याची चर्चा बारामतीत सर्वत्र सुरू होती परंतु , प्रसाद खारतोडे यांच्या विरोधातील दोन्ही उमेदवारांच्या पडलेल्या मतांची बेरीज केली तर दुप्पट मतदान Ad.प्रसाद खारतोडे यांना मिळाले आहे.खऱ्या अर्थाने प्रभागांमध्ये कौशल्य दाखवत प्रभागातील मतदारांच्या घरोघरी पोहोचत मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये चिकटने प्रचार करत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचारासाठी कष्ट आणि परिश्रम घेत विजय मिळवला.

त्यामुळे प्रभागातील मतदारांनी ६५% टक्के मतदान प्रसाद खारतोडे यांना करून त्यांना विजय केले आहे. बारामती मध्ये सर्वत्र प्रसाद खारकडे यांचीच चर्चा होऊ लागली आहे.!

प्रसाद खारतोडे कसे निवडून आले…

प्रभाग क्रमांक ७ अ मध्ये इतर सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तर बेरजेपेक्षा 300 मते प्रसाद खारतोडे यांना जास्त उमेदवार प्रसाद खारतोडे यांच्या विरुद्ध भाजपचे शहराध्यक्ष व भाजप प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब (तात्या) गावडे यांच्या जवळचे नातेवाईक उभे होते.प्रभाग क्रमांक ७ हा भाजपचा बालेकिल्ला मानल्या जात असून मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जयसिंग उर्फ बबलू देशमुख हे अपक्ष उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वीच्या उमेदवाराला म्हणजेच योगेश भैय्या जगताप यांना हरवले होते. त्यामुळे या वार्डात पुन्हा लढत ही चुरशीची होणार होती अशी चर्चा होती. प्रभाग क्रमांक ७ मध्य भाजपचे बाळासाहेब गावडे आणि RSs यांनी प्रसाद खारतोडे हे सीट पाडण्यासाठी जोर लावलेला होता.हे सीट पडणार आहे अशी सर्वत्र चर्चा सुरू होती परंतु प्रसाद खारतोडे यांची यंत्रणा सज्ज होती.आलेली प्रत्येक अडचण ते दूर करत गेले आणि प्रत्येक मतदारापर्यंत ते पोचले त्याचा निकाल आज आपल्याला दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद खारतोडे यांना ९९९ मतदान झाली असून शिवसेना गटातील सुरेंद्र जेवरे आणि अपक्ष उमेदवार सुजित वायसे यांची बेरीज केली तर सहाशे देखील मते होत नाहीत तर. याचाच अर्थ प्रसाद खारतोडे यांची यंत्रणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ, व इतर सर्वांनी निष्ठेने काम केले विजय हा निश्चित होतो. त्यामुळे प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवाराबाबत प्रचार यंत्रणेचे सर्वत्र कौतुक होत आहे.