सना सायबर फॉरेनसिक पुणे यांचा रिपोर्ट ,”मोहसीन पठाण याच्यावर गुन्हा दाखल.!
मेकिंग महाराष्ट्र – बारामती शहरातील नगरपरिषद निवडणूक सुरू झाल्या की विरोधकांवर टीका टिपणी करण्यास सुरुवात होते आणि हे काय नवीन नाही. ते बारामतीकरांनी जवळून पाहिलं आहे.एखाद्या प्रामाणिक उमेदवाराला विरोधकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव केला जातो हे या बातमीतून आपल्याला समजेल. घटना आहे बारामती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष बाबत. दोन दिवसापूर्वी एक हादरवून ठेवणारा असा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात आला होता. तो व्हिडिओ बारामती शहरातील निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार मोहसीन अकबर पठाण यांनी बारामती शहरातील एका youtube चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ मुलाखत दिली.यूट्यूब चैनल वाल्याने तो सोशल मीडियावर प्रकाशित केला..त्या व्हिडिओमध्ये बॅग भरून पैसे मोजतानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष जय पाटील दिसत आहेत आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट AI जनरेट करून टाकल्याचे देखील कोणालाही समजेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष यांची बदनामी कशी होईल हा आहे तो अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहसीन पठाण यांनी मनामध्ये ठेवून तो व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रकाशित केला. या घटनेमुळे बारामती शहरात खळबळ उडाली.आरोपी मोहसीन अकबर पठाण याला मुलाखत देत सांगितले की हा व्हिडिओ मला मेल द्वारे मिळाला आणि त्यामध्ये त्यांनी नावे देखील सांगितले.ज्या व्यक्तीने व्हिडिओ दिला.त्या व्यक्तीची पुष्टी न करता.मोसिन अकबर पठाण याने पत्रकारांमध्ये या संदर्भात माहिती देत सोशल मीडियावर माहिती देखील दिली. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पत्रकारांनी दोन्ही बाजू मांडणे गरजेचे होते हे देखील तितकेच खरे आहे मोसिन पठाण यांनी असा खळबळ जनक आरोप केल्यानंतर.वायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात शहराध्यक्ष जय पाटील यांना पत्रकारांनी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जय पाटील यांनी तो व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले.जय पाटील यांनी तात्काळ पोलिसात धाव घेत सायबर सेल पुणे येथे

संबंधित व्हिडिओ बाबत तक्रार केली आणि बारामती शहर पोलिसांना व्हिडिओ देत त्याची पुष्टी करण्यास सांगितले याबाबत बारामती शहर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली.व्हिडिओ AI जनरेट असल्याचे सायबर फॉरेन्सिक रिपोर्ट देत त्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आले.त्यामुळे शहराध्यक्ष जय पाटील यांचा व्हिडिओ हा फेक असल्याचे स्पष्ट झाले.यावरून बारामती शहर पोलीस स्टेशन येथे मोहसीन अकबर पठाण यांच्या विरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


आता कोण कोणते कलम मोसिन पठाण यांच्या विरोधात पोलिसांनी लावले आहेत आणि त्यामध्ये काय काय शिक्षा आहे हे खालील प्रमाणे सविस्तर.. कलम .BNS 171 (भारतीय न्याय संहिता कलम १७१) म्हणजे निवडणुकीत मतदारांवर किंवा उमेदवारांवर धार्मिक प्रभाव पाडून, त्यांना दैवी नाराजी किंवा आध्यात्मिक निंदा टाळण्यासाठी मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे, किंवा त्यांना विशिष्ट प्रकारे मतदान करण्यास प्रवृत्त करणे, ज्यामुळे त्यांच्या मतदानाच्या स्वातंत्र्यात अडथळा येतो, अशा कृत्यांसाठी शिक्षा तरतूद करणारे कलम आहे, जे निवडणुकांवर अवाजवी प्रभाव टाकण्यास प्रतिबंध करते. BNS कलम १७५ (BNS Section 175) भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १७५ हे निवडणुकीच्या संदर्भात खोटे विधान (False statement in connection with an election) करण्यासंबंधी आहे, ज्यात निवडणुकीचा निकाल प्रभावित करण्याच्या उद्देशाने उमेदवाराच्या चारित्र्याबद्दल किंवा वर्तनाबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्यांना शिक्षा होते, तर BNSS कलम १७५ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता) हे पोलिस अधिकाऱ्याला दखलपात्र (cognizable) गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार देते, विशेषतः जेव्हा मजिस्ट्रेटच्या आदेशानंतर पोलिस एफआयआर नोंदवत नाहीत. BNS कलम 356 म्हणजे भारतीय न्याय संहिता (BNS) मधील बदनामी (Defamation) शी संबंधित कलम आहे, जे भारतीय दंड संहिता (IPC) कलम 499 ची जागा घेते, आणि यात एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणाऱ्या विधानांवर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे; दोषी आढळल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे, आणि मृत व्यक्तीबद्दलही बदनामी केल्यास खटला दाखल होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या भावना दुखावतात. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६-सी (Section 66C) हे ओळख चोरीसाठी शिक्षा (Punishment for Identity Theft) याबद्दल आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, पासवर्ड किंवा इतर कोणतीही विशिष्ट ओळख वापरून फसवणूक केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असे Testbook, Indian Kanoon आणि KanoonGPT यांसारख्या स्त्रोतांद्वारे स्पष्ट केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे (IT Act) कलम 66D हे संगणक किंवा संप्रेषण साधनांचा वापर करून व्यक्तीची ओळख चोरून फसवणूक करणे याबद्दल आहे, ज्यात अशा गुन्ह्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो; हे कलम विशेषतः बनावट प्रोफाइलद्वारे किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ऑनलाइन फसवणुकीसाठी लागू होते, जसे की बनावट ईमेलद्वारे तपशील मिळवणे आणि पैसे चोरणे. माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा, 2000 मधील कलम 67 (कलम ६७) हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील किंवा लैंगिकदृष्ट्या स्पष्ट सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्याबद्दल आहे, ज्यामुळे पहिल्यांदा गुन्हा केल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, तर पुन्हा गुन्हा केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.हा कायदा सायबर गुन्हे आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहारांसाठी कायदेशीर चौकट प्रदान करतो. अशा वेगवेगळ्या कलमान्वये मोसिन अकबर पठाण यांच्यावर बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोसिन पठाण हा आरोपी बारामती शहरात व तालुक्यात जाणून-बुजून हे असे कृत्य करत आहे का.? हे पोलिसांनी तपासने गरजेचे आहे. मोहसीन पठाण याच्यावर पूर्वी देखील खंडणी सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर. गुन्हा रजिस्टर नंबर.१२१/२५. भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२),३०८(३) या कलमान्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आणि यासाठी मोसिन पठाण हे एक महिन्याच्या वर येरवडा कारागृहात माननीय न्यायालय कडून जामीन फेटाळल्यामुळे काही काळ भोगून आले आहेत.अशा वारंवार कृत्य व्यक्तींवर आणि बारामती शहरातील खंडणीच्या घटनांबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस बारामती विकसित होत असून अनेक व्यावसायिक उद्योजक या ठिकाणी काम कष्ट करत आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील प्रसिद्ध उद्योजक व्यवसायिक तसेच राजकीय नेतृत्व करणारे नेते असतील. यांची सुरक्षा पाहता. आणि अशा घटनांमुळे बारामतीची बदनामी होऊ नये यासाठी. पोलिसांनी तात्काळ गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे अशी चर्चा आता मोहसीन पठाण याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक बारामती शहरातील सुज्ञान नागरिक करू लागले आहेत.
