भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेवर आश्लील टिपणी केल्याबद्दल सौरभ वाघ यास अटक

मेकिंग महाराष्ट्र – सासवड : अलीकडील काळात सातत्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले या महापुरुषांवर टीका टिप्पणी करण्याचे पेवच फुटलेल आहे. भारतीय राष्ट्रध्वज, भारतीय संविधान याच्यावर देखील उपहासा त्मक बोलायला काही माथेफिरू, धर्मांध लोक मागे पाहत नाहीत.असाच काहीसा प्रकार सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील वीर येथे घडलेला आहे. प्रवीण सोनवणे व सौरभ सुरेश वाघ यांच्यामधे आपापसातील संभाषणामध्ये कोणतेही कारण नसताना सौरभ वाघ याने अश्लील भाषेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वर टिपणी केलेली आहे. याबाबत रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांना सदरची घटना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्याशी संपर्क साधून स्वतः संबंधित व्यक्तीवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार एफ.आय.आर. नंबर 469 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक कदम यांनी आरोपीच्या तात्काळ मुसक्या आवळलेले आहेत. यावेळी बिट अंमलदार संदीप पवार यांनी आरोपीस कुठलाही सुगावा न लागू देता ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंग गौर करीत आहेत. यावेळी पंकज धिवार यांच्यासोबत रवी वाघमारे, परवीण पानसरे, अतिश गायकवाड, प्रस्मित धिवार, मयूर बेंगळे, सागर यादव,मनीष रणपिसे, विकास देशमुख, प्रसाद साबळे, रितेश साबळे,सिद्धेश चौरे, बंटी रनपिसे, यश रणपिसे, अजय धिवार, राज निघोल, रोहित बाबर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.