बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथे सशाची शिकार.!

मेकिंग महाराष्ट्र -दि १८ बारामती तालुक्यात वन्य जीवांचे  जीव धोक्यात असून वनविभागाच्या अधिकारी मात्र हातावर हात बांधून बसले आहेत सुपे सोनवडी येथे फॉरेस्ट असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सशाची शिकार करताना शिकारी आढळत.शिकारी हा सोनवडी

सुप्याचा असून त्याच्या हातामध्ये अक्षरशः सश्याची शिकार केल्याचं दिसत आहे. सशाची शिकार करून त्याचे मास खाण्याच्या उद्देशाने त्याची कातडी काढण्यात आल्याचा फोटो आमच्या हाती लागला यावरून आम्ही संबंधित व्यक्तीची पूर्ण माहिती काढल्यानंतर सर्व माहिती समोर आली.आरोपी हा सुपा

या गावातील मळबाई मंदिरा शेजारीलर असल्याचे समजते. त्याच्या हातात सशाची शिकार करून त्याचे मास खाण्याच्या उद्देशाने त्याची कातडी काढण्यात आल्याचा फोटो आमच्या हाती लागला यावरून आम्ही संबंधित

व्यक्तीची पूर्ण माहिती काढल्यानंतर सर्व माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर,वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ नुसार बारामती विभागातील वनविभागाचे अधिकारी अशा शिकारींवर गुन्हा दाखल करून कारवाई करणार का हे आता पाहणे गरजेचे आहे.