ह.मोहम्मद पैगंबर (स.) जयंतीनिमित्त डॉ.इक्बाल चतुर्वेदी यांचे व्याख्यान संपन्न.!

मेकिंग महाराष्ट्र – बारामतीः ह.मोहम्मद पैगंबर (स.) यांच्या जयंतीचे औचित्य साधुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती फलटण रोड, बारामती यांच्या वतीने संस्कृत पंडीत, नेपाळचे डॉ.इक्बाल चतुर्वेदी यांचे धार्मिक व्याख्यानाचे आयेजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते कासम कुरैशी व जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष योगेश महाडिक यांनी केले होते. प्रथमतः डॉ.इक्बाल चतुर्वेदी यांचा समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ.चतुर्वेदी यांनी संस्कृत लोकाने सुरूवात केली. वेद, पुराणाची सविस्तर माहिती देत, मोहम्मद पैगंबर यांनी केलेल्या कार्याची ओळख करून दिली. ह.मोहम्मद पैगंबर हे फक्त मुस्लीमांचे नव्हते तर संपूर्ण विश्वाचे होते असेही ते म्हणाले. इस्लामने दिलेल्या नियम व अटींचे पालन करण्यास त्यांनी सांगितले.यावेळी दर्गाह मशिदीचे मौलाना आमिर रजा कादरी, वेळापूरचे मौलाना अमीन निजामी, दर्गा मशिदीचे कारी तस्लीम रजा कादरी, सय्यद भाऊसाहेब बानप आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय खरात, मुनीर तांबोळी, तैनुर शेख, गौरव अहिवळे, अस्लम तांबोळी इ. उपस्थित होते.गेली तीन वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समिती फलटण रोड, बारामती यांच्यातर्फे विविध महापुरूषांच्या जयंती, उत्सव साजरा करण्यात येते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौस कुरैशी यांनी केले. शेवटी प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मुस्लीम बांधवांचे स्वागत कासम कुरैशी,सय्यद भाऊसाहेब आणि योगेश महाडीक, फिरोज सय्यद, जमीर सय्यद, अफ्रोज मुजावर यांनी केले.