
मेकिंग महाराष्ट्र – बारामती दि.19- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, मा. सह-आयुक्त अंमलबजावणी व दक्षता श्री. पी. पी. सुर्वे .विभागीय उपआयुक्त पुणे विभाग, श्री. सागर धोमकर , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे श्री. अतुल कानडे व मा. उपअधीक्षक श्री. उत्तम शिंदे हडपसर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बारामती विभाग जि. पुणे, यांनी वंजारवाडी गावाच्या हद्दीत भिगवण-बारामती रोड वरील हॉटेल, ब्रम्हचैतन्य जवळ,गोपनीय खात्रीलायक बातमीदार नुसार एक संशयित चारचाकी मारुती सुझुकी या कंपनीची स्विफ्ट.डिझायर गाडी थांबवल्यानंतर तपासणी केली असता, या वहानामध्ये बनावट विदेशी मद्याचे रॉयल.स्टॅग व्हिस्कीचे 180 मिली क्षमतेचे 5 बॉक्स व इम्पेरीयल ब्ल्यू व्हिस्कीचे 180 मिलीचे 5.बॉक्स मिळून आले. सदरचा दारूबंदी गुन्हयाचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून ताब्यात घेण्यात आला.मद्य व जप्त वाहनासह इतर मुद्देमाल किंमत रु 6,22,800 /- रु. अक्षरी रुपये (सहा लाख बावीस हजार आठशे) इतकी असून सदरच्या गुन्हयात आरोपी अमोल सदाशिव शिंदे वय – 38 वर्षे रा. देवळाली ता. करमाळा जि.सोलापूर यालाअटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. हि कारवाई निरीक्षक श्री. शहाजी आ.शिंदे, दुय्यम निरीक्षक श्री.सागर मा. साबळे, श्री. गिरीशकुमार बा. कर्चे, श्री. प्रदीप झुंजरुक, श्री. मयूर गाडे, स. दु. नि. श्री. गणेश जाधव व जवान सर्वश्री निखिल बा. देवडे, सुरेश क. खरात, सागर दुबळे, संकेत वाझे, डी.जे.साळुंके यांनी केली सदर कारवाईचा पुढील तपास श्री. सागर मा. साबळे दुय्यम निरीक्षक हे करीत आहेत.
